२९ मे वार्ता: आज सोमवार दि. २९ मे रोजी उष्ण व दमट हवामानाबरोबरच आकाश ढगाळ होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दक्षिण भागासह विदर्भात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहून, मेघगर्जना, विजांसह, पावसाची शक्यता आहे. दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा आणखी काही भाग, तसेच अंदमान बेटांच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक स्थिती आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात वादळी पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे