२० जुलै वार्ता: पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, पालघर, पुणे, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पावसाच्या जोरदार सरी कोसळणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यानुसार अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून जिल्ह्यातील उत्तरेकडील तालुक्यातील घाट भागात विशेषतः उद्या रात्री मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
