६ ऑगस्ट वार्ता: राज्यात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणण्याची आमची सिद्धता असून ते काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. कोणत्याही क्षणी तो कायदा येऊ शकतो, असा विश्वास भाजपचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने ५ ऑगस्ट या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु जनआक्रोश मोर्चात ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांची प्रकरणे वाढत असल्याचा आरोप करत हिंदु संघटनांनी त्याविरोधात मोर्च्याचे आयोजन केले होते. ८ दिवसांपूर्वी ३ अल्पवयीन मुलींनी, तर २ दिवसांपूर्वी २ मुलींनी राहुरी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार प्रविष्ट केली होती. काही दिवसांपूर्वी विधान परिषदेत यासंदर्भात लक्षवेधी मांडण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर मोर्चा आयोजित केला होता.आमदार नीतेश राणे या वेळी म्हणाले की…
१. हिंदु राष्ट्राला सुरक्षित ठेवण्याचे काम आम्ही करत असून त्यासाठी जे करावे लागेल, ते कायदे करण्यात येतील.
२. जो इथे रहातो, तो वन्दे मातरम् म्हणतो. अबू आझमी यांना हिंदु धर्मात यायचे असेल, तर आम्ही त्यांचे स्वागत करू; पण आमच्या देशात रहायचे असेल, तर त्यांना वन्दे मातरम् म्हणावेच लागेल.