Home स्टोरी राज्‍यातील मुलींना ‘युवती स्‍वसरंक्षण’ देण्‍याचा निर्णय! युवती स्‍वप्रशिक्षण’ शिबिर चालू होणार…..

राज्‍यातील मुलींना ‘युवती स्‍वसरंक्षण’ देण्‍याचा निर्णय! युवती स्‍वप्रशिक्षण’ शिबिर चालू होणार…..

108

२२ जून वार्ता: शासनाने राज्‍यातील मुलींना ‘युवती स्‍वसरंक्षण’ देण्‍याचा निर्णय घेतला आहे. लव्‍ह जिहाद विरोधात, तसेच राज्‍यात महिला आणि मुली यांच्‍या होणार्‍या निर्घृण हत्‍या, तसेच हिंसाचार यांच्‍या विरोधात राज्‍य सरकारने हे पाऊल उचलले आहे, अशी माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईत पत्रकार परिषदेद्वारे दिली.

‘युवती स्‍वसरंक्षण’ हे राज्‍यातील प्रत्‍येक शाळेमधील मुलींना शिकवावे लागणार आहे. यासाठी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षणमंत्री यांना याविषयी पत्र लिहिणार असल्‍याचे लोढा यांनी सांगितले. महिला बालविकास विभागाच्‍या वतीने राज्‍यात ‘युवती स्‍वप्रशिक्षण’ शिबिर चालू केले जाणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या ३५०व्‍या राज्‍याभिषेकदिनाच्‍या निमित्त राज्‍यात ३ लाख ५० सहस्र युवतींना हिंसाचाराविरुद्ध मनोबल उंचावण्‍यासाठी स्‍वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. सर्व विद्यापिठे आणि स्‍वयंसेवी संस्‍था यांच्‍या साहाय्‍याने ‘राजमाता जिजाऊ युवती स्‍वसंरक्षण प्रशिक्षण’ कार्यक्रम राबवण्‍यात येणार आहे. ३ जुलै ते १५ जुलै दरम्‍यान हे प्रशिक्षण राबवण्‍यात येईल. ही संस्‍था विनामूल्‍य प्रशिक्षण देणार आहे. एस्.एन्.डी.टी. आणि मुंबई विद्यापीठ यांच्‍या समवेत लवकरच स्‍वाक्षरी करून राज्‍यभर ही मोहीम राबवली जाईल.