Home राजकारण राज्याचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांकडे ?

राज्याचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांकडे ?

110

१ ऑगस्ट वार्ता: अजित पवार बंडखोरी करत सत्तेत सहभागी झाले आणि उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले होते. या जागेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडूनही दावा करण्यात येत होता. नियमानुसार, विधानसभेत ज्याचे सर्वाधिक सदस्य त्याचा विरोधी पक्षनेता असतो. त्यानुसार, महाविकास आघाडीत आता सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे असल्याने विरोधी पक्षनेते पदही काँग्रेसला देण्यात आले आहे. विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेता असतील असा काँग्रेसने निर्णय घेतला आहे. विधान परिषदेतील आमदार सत्यजित तांबे यांनी याबाबत ट्वीट करून ही माहिती दिली आहे. मात्र याबाबत काँग्रेसकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.