Home स्पोर्ट राज्यस्तरीय डेरवण युथ गेम्स स्पर्धेत सावंतवाडीच्या आयुष दत्तप्रसाद पाटणकर याने तिसऱ्या वर्षी...

राज्यस्तरीय डेरवण युथ गेम्स स्पर्धेत सावंतवाडीच्या आयुष दत्तप्रसाद पाटणकर याने तिसऱ्या वर्षी सुवर्णपदक मिळवून हॅट्रिक साधली!

156

सावंतवाडी प्रतिनिधी: दि. १० मार्च : डेरवण येथील एस. व्ही. जे. सिटी संकुलनात सुरू असलेल्या राज्यस्तरीय डेरवण युथ गेम्स स्पर्धेत सावंतवाडीच्या आयुष दत्तप्रसाद पाटणकर याने दहा मीटर पिस्तूल नेमबाजी क्रीडा प्रकारात सलग तिसऱ्या वर्षी सुवर्णपदक मिळवून हॅट्रिक साधली आहे. सावंतवाडी येथील उपरकर शूटिंग अकॅडमी मध्ये तो नेमबाजीचे प्रशिक्षण घेत असून त्याला प्रशिक्षक कांचन उपरकर आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले यांचे मार्गदर्शन लाभले आहे .महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन सह महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक गेम्स २०२२-२०२३ साठी त्याची निवड झाली होती. याशिवाय भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये त्याने भारतीय निवड चाचणीत आपली पात्रता सिद्ध केली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य क्रीडा  आणि युवक संचनालय आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा स्तरीय स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.