Home स्टोरी राजा शिवाजी विद्यालय हे विलवडे पंचक्रोशीचे वैभव आहे…! शालेय शिक्षण मंत्री दीपक...

राजा शिवाजी विद्यालय हे विलवडे पंचक्रोशीचे वैभव आहे…! शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

135

सावंतवाडी: राजा शिवाजी विद्यालय हे विलवडे पंचक्रोशीचे वैभव आहे. या हायस्कूलच्या नवीन इमारतीसाठी सहकार्य केले जाईल तसेच विलवडे ग्रामस्थांनी सुचवलेल्या विकास कामांसाठी आवश्यक निधी देण्याची ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विलवडेवासीयांना दिली. मंत्री दीपक केसरकर भालावल येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना विलवडे ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली त्यावेळी मंत्री केसरकर बोलत होते.

यावेळी विलवडे ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने विलवडे परिसराचे भूषण असलेल्या राजा शिवाजी विद्यालयाची प्रशस्त व सुसज्ज इमारत बांधण्याबाबत मंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधल्यानंतर यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच यावेळी विलवडे ग्रामस्थांनी विलवडे हायस्कूल, गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिर येथे हायमास्टसह इतर विकास कामांबाबत चर्चा केल्यानंतर यासाठी आवश्यक तो निधी देण्याची ग्वाही मंत्री दीपक केसरकर यांनी या शिष्टमंडळाला दिली.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, उपजिल्हा प्रमुख विनायक दळवी, सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण राणे, गजानन नाटेकर, मंत्री दीपक केसरकर यांचे पिए जितेंद्र काळे, रामचंद्र आंगणे, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, सामाजिक कार्यकर्ते सोनू दळवी, भालावल सरपंच समीर परब, उपसरपंच अर्जुन परब, रमेश परब, सरमळे सरपंच विजय गावडे, माजी उपसभापती कृष्णा सावंत, शिवसेना माजगाव विभागप्रमुख उमेश गावकर, तांबोळी माजी सरपंच शिवराम सावंत, विलवडे ग्रामपंचायत चंद्रकांत दळवी, विलवडे हायस्कूलचे मुख्याध्यापक बुद्धभूषण हेवाळकर, प्रगतशील युवा शेतकरी प्रमोद दळवी, प्रफुल्ल सावंत परेश धरणे, सुहास बांदेकर श्री पाडवी आदी उपस्थित होते.