Home स्टोरी रश्मी ठाकरे यांच्या कथित मालकीच्या अलिबाग येथील १९ बंगले प्रकरणी देवेंद्र फडणविसांनी...

रश्मी ठाकरे यांच्या कथित मालकीच्या अलिबाग येथील १९ बंगले प्रकरणी देवेंद्र फडणविसांनी दिली प्रतिक्रिया!

243

२९ जून वार्ता: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर अलिबागच्या जंगलात १९ बंगले बांधल्याचा आरोप केला होता. याबाबत त्यांनी संबंधित विभागात तक्रारही केली होती. मालमत्ता रश्मी ठाकरे यांच्या नावावर आहे. चौकशी सुरू आहे. तर रश्मी ठाकरे यांची चौकशी का केली जात नाही? असा प्रश्न राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याप्रकरणी तक्रार दाखल झालेली आहे. आता लवकरच चार्जशीट तयार होईल. तसेच रश्मी ठाकरे यांच्या चौकशीची आवश्यकता नाही. आणि चौकशी कुणाची करावी आणि कुणाची नाही हे सरकार ठरवत नाही. हे पोलीस ठरवतात.

आमचं सरकार तपासयंत्रणांच्या कुठल्याही कामात हस्तक्षेप करत नाही. जसे महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे करत होते. आम्ही हस्तक्षेप केला तर सिस्टीम नीट चालणार नाही. पोलिसांना ज्याची चौकशी करायची आहे ते करतील. मी एवढेच सांगतो, जो चुकीचा असेल त्याच्यावर कारवाई होणार असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.