सावंतवाडीत प्रतिनिधी:
रविवार दि. १० डिसेंबर रोजी सावंतवाडी येथे मोफत कॅरम कोचिंग सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीतर्फे विदयार्थ्यांना मोफत कॅरम कोचिंग देण्यात येणार आहे.सेमिनारचे आयोजन जगन्नाथराव भोंसले उदयानाच्या मागील बाजूस मुक्ताई ॲकेडमीच्या जागेत करण्यात आले आहे.सेमिनार सकाळी ०९:३० ते दुपारी ०१:३० या वेळेत घेण्यात येईल.नाव नोंदणी व अधिक माहीतीसाठी विदयार्थ्यांनी 8007382783 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर यांनी केले आहे.सहभाग घेणा-या विदयार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.







