Home स्टोरी रयत संस्थेत निवड झालेल्या शिक्षकांचे मुंबईत धरणे आंदोलन!

रयत संस्थेत निवड झालेल्या शिक्षकांचे मुंबईत धरणे आंदोलन!

184

मुंबई प्रतिनिधी: पवित्र पोर्टलमधून निवड झालेल्या उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांसाठी विनामुलाखत निवड यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार उमेदवारांनी विषय व संवर्गानुसार पसंतीक्रमाने शाळेची निवड केली आहे. यात रयत शिक्षण संस्थेच्या राज्यातील विविध ठिकाणच्या शाळा निवडलेले ६४३ जण आहेत. मात्र, रयत शिक्षण संस्थेकडून या शिक्षकांना रुजू करुन घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवारपासून उमेदवारांनी मुंबईत आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. उमेदवारांनी अनेक दिवसांपासून पुणे आयुक्त कार्यालया समोर धरणे आंदोलन केले. त्यांनी शालेय शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, तोडगा न निघाल्याने त्यांनी मुंबईत उपोषण सुरू केले आहे. येत्या काही महिन्यात राज्य विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नियुक्ती मिळावी, अशी मागणी या शिक्षकांनी केली आहे.

पवित्र पोर्टलमधून निवड झालेल्या उमेदवारांची वेगवेगळ्या संस्थांत नियुक्ती झाली आहे. परंतु रयत शिक्षण संस्थेत नियुक्तीला अडचणी येत आहेत. राज्य सरकारने याप्रश्नी लक्ष घालून तातडीने विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी हा विषय मार्गी लागावा अशी मागणी प्रशांत शिरगुर यांनी केली आहे. गुणवत्ता यादी प्रसिध्द होऊन तब्बल पाच महिने उलटले आहेत मात्र, निवड झालेल्या उमेदवारांना शासनाकडून अथवा संस्थेकडून कागदपत्रांची पडताळणी व नियुक्तीसाठी अधिकृत सूचना दिली गेली नसल्याने हे उमेदवार नैराश्याच्या गर्तेत आहेत. रयत शिक्षण संस्थेने नियुक्तीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी उमेदवार करत आहेत. पवित्र पोर्टल शिक्षक भरती २०२२ अंतर्गत घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेची गुणवत्ता यादी दिनांक २५.०२.२०२४ रोजी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली. सदर गुणवत्ता निवड यादीमध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये एकूण ६४५ उमेदवारांची विना मुलाखत शिफारस झाली पण पाच महिने उलटले तरी रयत शिक्षण संस्थेद्वारे आणि शिक्षण आयुक्त कार्यालयाद्वारे शिफारस पात्र उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी व नियुक्तीची कोणतीच सूचना देण्यात आलेली नाही. माननीय उच्च्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्र. १८०/२०२४ मध्ये १२,०२,२०२४ रोजी दिलेल्या निर्णयानुसार स्वत शिक्षण संस्थेमध्ये पदभरती करण्यावर स्थगिती देण्यात आली होती. तरी न्यूज बुलेटीन दिनांक १४.०२.२०२४ रोजीच्या प्रसिद्धी पत्रकानुसार असे सांगण्यात आले की रयत शिक्षण संस्थेच्या न्यायालयीन प्रकरणाचा उमेदवारांच्या निवडीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही परंतु या न्यायालयीन निर्णयामुळे पवित्र प्रणाली २०२२ अंतर्गत रयत शिक्षण संस्थेत निवड झालेल्या गुणवत्ताधारक उमेदवारांच्या नियुक्तीवर स्थगिती देण्यात आली आहे. गुणवत्ता सिद्ध केली तरी आज पर्यंत नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या नियुक्तीसाठी वण वण फिरावे लागत आहे.

नियुक्तीपासून वंचित गुणवत्ताधारक उमेदवारांच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. 

१) पवित्र पोर्टल २०२२ मार्फत शिफारस पात्र ठरलेल्या पण नियुक्ती पासून वंचित असलेल्या ६४५ गुणवत्ताधारक

उमेदवारांना तात्काळ नियुक्तीचे आदेश आयुक्त कार्यालया मार्फत देण्यात यावेत.

२) न्यायालयीन आदेशान्वये रयत शिक्षण संस्थेत नियुक्ती होत नसेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदरील उमेदवारांचे समायोजन करून नियुक्ती आदेश आयुक्त स्तरावरून देण्यात यावेत. ३) तात्काळ नियुक्ती आदेश द्या अन्यथा नियुक्तीस पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळेपर्यंत किमान वेतन कायद्यानुसार मानधन देण्यात यावे.

४) गुणवत्ता यादी प्रसिद्ध होऊन पाच महिने उलटले तरी नियुक्ती मिळाली नाही. नियुक्ती देण्यास जेवढा अधिकचा कालावधी लागेल तेवढा कालावधी शिक्षण सेवक कालावधी म्हणून गृहीत धरण्यात बाबत.

५) शिफारस पात्र गुणवत्ताधारक उमेदवारांना येत्या आठ दिवसांत नियुक्तीचे आदेश द्या अन्यथा भविष्यातील होणाऱ्या उमेदवारांच्या आर्थिक , शैक्षणिक तसेच मानसिक नुकसान होणार नाही याची लेखी हमी द्या.

अशा मागणीचे लेखी निवेदन दिनांक ८ जुलै, २०२४ रोजी शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे वंचित शिक्षकांनी दिले. मागणी हक्कासाठी दिनांक १० जुलै, २०२४ रोजी शांततेच्या मार्गाने एकत्र येऊन आंदोलन केले आहे . आंदोलनात बहुसंख्य भावी गुणवत्ताधारक उमेदवार महाराष्ट्र भरातून एकत्र जमले होते. वंचित गुणवत्ताधारकांनी आयुक्त कार्यालयात आयुक्त तसेच उपायुक्तांसोबत चर्चा केली तसेच उपमुख्यमंत्री अजित

पवारांना निवेदण दिले.आणि लवकरात लवकर नियुक्ती देण्या बाबत शासन स्तरावरून प्रयत्न करु असा शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी विश्वास दिला. विद्यमान आमदार दादा भुसे, मंत्री तानाजी सावंत, विरोधी पक्ष नेते नाना पटोले, मंत्री गिरीश महाजन व इतर बऱ्याच विद्यमान आमदारांना निवेदने दिली. मंत्रिमंहोड्यानी शासस्तरावरून प्रयत्न करून नियुक्ती बाबत सकारात्मक भूमिका घेऊ असे आश्वासन वंचित उमेदवारांना दिले. समस्त भावी शिक्षकांना अशी अपेक्षा आहे की लवकरच नियुक्तीचे पत्र मिळून शिक्षक पदी रूजू होऊन उज्जव पिढी घडवण्याची जबाबदारी मिळेल. अशी माहिती शिक्षकांच्या वतीने देण्यात आली.