कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): मुळ शिसेनेत ४१ वर्षे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले कल्याण पूर्वेतील ठाकरे गटाचे कल्याण विधानसभा संपर्क प्रमुख रमाकांत देवळेकर यांनी आपल्या वाढदिवस दिनी – २४ एप्रिल २०२३ रोजी शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश करून ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केला. तेव्हापासुन आज पर्यंत कसल्याही पदाविना शिंदे गटात कार्यरत असलेल्या रमाकांत देवळेकर यांची अखेर कल्याण उपजिल्हा प्रमुख पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे आदेशाने आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या शिफारसी नुसार जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी रमाकांत देवळेकर यांची कल्याण उपजिल्हा प्रमुख तसेच उत्तर पाश्चिम मुंबईच्या निरिक्षक पदी नियुक्ती जाहिर केली. कल्याण पूर्वेत प्रशासनामधील राजकीय रणनितीकार तसेच निवडणूक प्रक्रियेतील कार्यकुशल नियोजक म्हणून ओळख असलेले रमाकांत देवळेकर यांची एकाच वेळी उपजिल्हा प्रमुख तसेच उत्तर पश्चिम मुंबईच्या निरिक्षक पदी निवड झाल्या बद्दल त्यांचेवर सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .