Home स्टोरी रझाकारांना धडा शिकवणार्‍यांनो आता ‘सजाकारांना’ शिक्षा द्या ! – राज ठाकरे

रझाकारांना धडा शिकवणार्‍यांनो आता ‘सजाकारांना’ शिक्षा द्या ! – राज ठाकरे

107

मुंबई:  तुम्‍ही जो लढा दिला तो तुमच्‍या तोंडाला कुणीतरी पाने पुसावीत यासाठी नव्‍हता, याचे स्‍मरण राहू दे. तुम्‍हाला गृहित धरणार्‍यांना धडा शिकवण्‍याची हीच वेळ आहे. तुम्‍ही रझाकारांना धडा शिकवलात, आता तुमच्‍यावर ही वेळ आणणार्‍या ‘सजाकारांना’ शिक्षा द्या, असे ट्‍वीट राज ठाकरे यांनी मराठावाडा मुक्‍तीसंग्रामदिनाच्‍या निमित्ताने केले.या ट्‍वीटमध्‍ये राज ठाकरे यांनी म्‍हटले आहे, ‘‘मराठवाडा मुक्‍तीसंग्राम हा विलीनीकरणाचा लढा नव्‍हता, तर तो देशाच्‍या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. केवळ मराठवाड्यात येऊन आश्‍वासनांची खैरात वाटणे म्‍हणजे हा दिवस साजरा केला, असे मानून चालणार नाही. पाण्‍यासाठी मराठवाड्याला अनेक दशके झळ सोसावी लागत आहे. पुरेसा पाऊस न पडल्‍यामुळे या वर्षीही मराठवाड्यात पुढच्‍या काही मासांत पाण्‍यासाठीची वणवण बघायला मिळेल. अशा वेळी एकाने आश्‍वासन द्यायचे आणि दुसर्‍याने टीका करायची, टीका करणार्‍यांनी स्‍वत: सत्तेत असतांना काय केले ? याचा विचार करायचा नाही, हे चालणार असेल, तर मराठवाड्यातील जनतेने आता दोघांनाही (सत्ताधारी आणि विरोधक) प्रश्‍न विचारायची वेळ आली आहे.’’