Home स्टोरी रक्षाबंधन आपल्या मदतनिसांसोबत….

रक्षाबंधन आपल्या मदतनिसांसोबत….

172

सावंतवाडी: आज सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिली च्या वर्गात अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

समाजातील प्रत्येक घटकाचा आपणास उपयोग होत असतो त्यामुळे आपले जीवन योग्य मार्गाने पूर्ण होत असते. अशा समाजातील मदतनीसांचे ऋणानुबंध जपावे या सामाजिक बांधिलकीतून हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला

रक्षाबंधन साठी सावंतवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक- श्री अमित गोते सर, पोलीस कर्मचारी श्री जाधव, सैनिक -श्री अमोल सावंत ,डॉक्टर- श्री प्रसाद नार्वेकर, सुतार -श्री प्रशांत राऊळ ,शेतकरी -श्री संतोष पालव, शिक्षक – ( मुख्या )श्री. प्रदीप सावंत इत्यादी आपले मदतनीस उपस्थित होते. मुलांनी स्वतः बनवलेल्या राख्या सर्वांना बांधून आगळे वेगळे रक्षाबंधन साजरे केले.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री गोते सर यांनी मुलांशी छान गप्पा गोष्टी केल्या. मुलांची गाणी ऐकली. मुलांनीही सर्वाशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी वर्गशिक्षिका श्रीम. स्वरा राऊळ व श्रीम संजना आडेलकर तसेच श्री. वरक सर , श्री. कांबळे सर, श्रीम गुंजाळ मॅडम, श्रीम. बिले मॅडम, श्रीम. घाडीगावकर मॅडम इत्यादी शिक्षक उपस्थित होते.