Home स्टोरी युवासेनेच्या ईशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासन नरमले..! योगेश धुरी, युवासेना तालुकाप्रमुख कुडाळ 

युवासेनेच्या ईशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासन नरमले..! योगेश धुरी, युवासेना तालुकाप्रमुख कुडाळ 

245

कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भरतीत जवळपास ९०% शिक्षक हे पर जिल्ह्यातील आहेत. युवासेनेने इशारा दिल्यानंतर प्रशासनाने नियुक्ती प्रकियेला स्थिगिती दिली. केसरकरांच्या चुकीच्या निर्णयामुळे अनेक स्थानिक बेरोजगार यांच्यावर अन्याय झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे जिल्हाबाहेरील लोकांची फुगीर भरती चे केंद्र झाले आहे, ते पण इथल्या सत्तेतील नेत्यांमुळे..! आमच्या स्थानिकांनी कांय करायच ? असा सवाल युवासेना तालुकाप्रमुख कुडाळ योगेश धुरी यांनी केला.

योगेश धुरी पुढे म्हणले, युवासेना कायम स्थानिकांच्या मागे भक्कम पणे उभी राहिली आहे. भाजपाला स्थानिक फक्त मतां पुरते हवे आहे, अमाप पैशाची मस्ती जनता लवकरच उतरवणार. स्थानिक डी. एड. वाल्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे, खर्च करून त्या पदवीचा उपयोग नसेल तर अश्या पदव्या बंद कराव्यात. राणेनी शब्द दिला होता राणे पलटले, केसरकर कांय जिल्ह्यातील बेरोजगारांची फसवणूक करून त्यांना देशोधडीला लावण्यासाठीच त्यांचा जन्म झाला आहे. जोपर्यंत डी एड च्या स्थानिकांना न्याय मिळत नाय तोपर्यंत युवासेना त्यांच्या पाठीशी उभी राहिल असं  युवासेना तालुकाप्रमुख कुडाळ योगेश धुरी यांनी स्पष्ट केलं.