सिंधुदुर्ग: तेंडोली,माड्याचीवाडी ची युवासेनेची बैठक युवासेना कोकण सचिव तथा जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी युवासेना तालुकाप्रमुख योगश धुरी, शिवसेना विभागप्रमुख संदेश प्रभू, माड्याची वाडी सरपंच विघ्नेश गावडे युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, युवासेना विभागप्रमुख कौशल राऊळ ,तसेच युवासेना शाखाप्रमुख, शिवसेना पदाधिकारी होते.
यावेळी मंदार शिरसाट यांनी खासदार विनायकजी राऊत साहेब यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर ही निवडणुक लढायची आहे असे सांगितले तसेच खासदारांच, आमदारांचं विशेष प्रेम या भागावर आहे,तेंडोली,माड्याची वाडी ग्रामपंचायत वर शिवसेनेची सत्ता आहे आणि या भागातील लोकांचे शिवसेनेवर प्रेम आहे आणि हे येत्या निवडणुकीत दिसेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी युवासेना मोठ्या ताकदीनिशी खासदार साहेबांच्या पाठीशी उभी राहून जास्तीत जास्त युवावर्ग खासदार राऊत साहेबानच्या पाठीशी उभा करू असा विश्वास दिला.