कुडाळ प्रतिनिधी: मंदार शिरसाट यांना कोकण पदवीधरची उमेदवारी मिळावी अशी सिंधुदुर्ग युवासेनेची मागणी असेल मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पदवीधर नोंदणी निवडणुक जाहीर व्हायच्या अगोदर नोंदणी सुरु केली.
युवासेना कोकण सचिव मंदार यांच्या नेतृत्वाखाली डी. एड. च्या बेरोजगारांसाठी केलेले आंदोलंनाची दखल महाराष्ट्राने घेतली. प्रसंगी गुन्हेहि दाखल झाले अनेकवेळी तरुणांचे प्रश्न हाताळले त्यांना न्याय पण दिला मंदार शिरसाट यांनी कुडाळ शहराचा कारभार पण उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष म्हणून उत्तम रित्या सांभाळला.
युवासेना सिंधुदुर्ग च्या वतीने युवासेना कोकण सचिव मंदार शिरसाट यांना कोकण पदवीधरची उमेदवारी मिळावी अशी युवासेना पक्षाकडे मागणी करणार आहे.
यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर नानोस्कर, युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी, सावंतवाडी तालुकाप्रमुख कौस्तुभ गावडे, वेंगुर्ला तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, दोडामार्ग मदन राणे, मालवण तालुकाप्रमुख मंदार गावडे, युवासेना मालवण तालुका समन्वयक मंदार ओरोसकर,युवासेना कुडाळ शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर,कुडाळ शहर समन्वयक अमित राणे उपस्थित होते.