Home स्टोरी यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न, जिद्द व चिकाटी गरजेची..! प्रा. रुपेश...

यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न, जिद्द व चिकाटी गरजेची..! प्रा. रुपेश पाटील

85

होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबईमार्फत आयोजित ‘चला शोधुया करिअरच्या वाटा’ या स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शनाला मिळाला उस्फूर्त प्रतिसाद

 

सावंतवाडी प्रतिनिधी: यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी अंगी प्रामाणिक प्रयत्न, जिद्द व चिकाटी गरजेची आहे. तरच युवा पिढी स्पर्धात्मक युगात टिकू शकते. आजचे युग हे स्पर्धेचे आहे.आजच्या युवा पिढीने स्पर्धात्मक परीक्षा तसेच करिअर मार्गदर्शन सारख्या उपक्रमांमध्ये भाग भाग घेऊन आपले ध्येय निश्चित करणे गरजेचे आहे. तरचं आपण समाजात योग्य नोकरी व उच्च पदावर किंवा उचित उद्योग व्यवसाय सुरू करु शकतो, असे मत सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी होडावडा येथे व्यक्त केले.

 

प्रा. रुपेश पाटील यांनी पुढे सांगितले की, आज दहावी ,बारावी मध्ये कोकणातील विद्यार्थी चांगले यश संपादन करतात. कोकणातील विद्यार्थी हुशार आहेत. मात्र यूपीएससी, एमपीएस परीक्षेमध्ये कोकणातील विद्यार्थी फारसे झळकताना दिसत नाहीत. ही मोठी एक खंत आहे, आज कोकणातील विद्यार्थी मागे का पडतो?, याचा विचार करणे गरजेचे आहे. आज कोकणातील सर्व शासकीय कार्यालय, बँका व इतर संस्थांमध्ये विचार करतात सर्व अधिकारी वर्ग हा बाहेरचा दिसून येतो, यांचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांनी पण स्पर्धात्मक युगात पुढे सरसावून यश संपादन केले तर कोकणातील शासकिय कार्यालय ठिकाणच्या महत्त्वाच्या पदावर आपण पोहोचू शकतो, असे मत यावेळी प्राध्यापक रुपेश पाटील यांनी मार्गदर्शन कार्यक्रम व्यक्त केले.

 

कोकणातील विद्यार्थी यांना दहावी बारावी झाल्यानंतर करिअरची योग्य दिशा न मिळाल्याने ते स्पर्धा परीक्षा व शासकीय अधिकारी पदावर जाण्यापासून परावृत्त होत आहे. योग्य मार्गदर्शन दिशा मिळाल्यास कोकणातील विद्यार्थी पण अधिकारी पदावर पोहचू शकतात, असे मत प्रा. रुपेश पाटील यांनी होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबई मार्फत आयोजित केलेल्या ‘चला शोधुया करिअरच्या वाटा’ या स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमावेळी मत व्यक्त केले.

 

यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन व्यासपीठावर होडावडे सरपंच सौ. रसिका केळुसकर , होडावडे ग्रामोन्नती मंडळाचे संचालक श्री रमेश मेस्त्री, प्रा. रुपेश पाटील, होडावडे केंद्र शाळा मुख्याध्यापक प्रशांती दळवी, माजी सरपंच सौ. अदिती नाईक, होडावडे ग्रामोन्नती मंडळ स्थानिक प्रतिनिधी रामचंद कुडाळकर, उमेश पावनोजी, रवींद्र केळुसकर, समीर सावंत, तात्या मेस्त्री, हनुमंत सरवणकर, आदी यावेळी उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी होडावडे ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश दळवी, उपाध्यक्ष नंदकिशोर पार्सेकर,सचिव ऋषिकेश धावडे ,खजिनदार प्रकाश नाईक, यांचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश पावणोजी, प्रास्ताविक रामचंद्र कुडाळकर, आभार प्रदर्शन समीर सावंत यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवर यांचे स्वागत हनुमंत सरवणकर, समीर सावंत, रवींद्र केळुस्कर, तात्या मेस्त्री यांनी केलें . हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी उमेश पावनोजी, रामचंद्र कुडाळकर,रवींद्र केळुसकर, समीर सावंत, तात्या मेस्त्री,हनुमंत सरवणकर, महेश होडावडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.