Home स्टोरी यशाचा पाठलाग करा: सूर्यकांत पालव यांचे आवाहनबिळवस येथे गुणवंतांचा गुणगौरव

यशाचा पाठलाग करा: सूर्यकांत पालव यांचे आवाहनबिळवस येथे गुणवंतांचा गुणगौरव

384

मसुरे प्रतिनिधी: (पेडणेकर): अभ्यास करताना सातत्य ठेवा. प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातील. यश मिळविणे सोपे असले तरी ते टिकविणे तितकेच कठीण आहे. जीवनात नेहमी मोठी स्वप्ने बघा आणि जागे पणी स्वप्नांचा पाठलाग करा असे आवाहन बिळवस ग्रामसेवा मंडळ अध्यक्ष तथा माजी मुख्याध्यापक सूर्यकांत पालव यांनी येथे केले. बिळवस ग्रामसेवा मंडळाच्या वतीने दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम माध्यमिक विद्यालय बिळवस येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी इयत्ता १२ वी मध्ये ७५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. सेवानिवृत्त झालेले सहाय्यक शिक्षक श्री. रमेश सिताराम नाईक यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमासाठी बिळवस ग्रामसेवा मंडळ अध्यक्ष सुर्यकांत जगन्नाथ पालव, सरपंच सौ. मानसी लक्ष्मण पालव, संस्था कार्याध्यक्ष दाजी विश्राम पालव, शाळा समिती उपाध्यक्ष व माजी पोलीस पाटील श्री. गोविंद सोम सावंत, संस्था सरचिटणीस अशोक जनार्दन पालव, खजिनदार श्री. प्रभाकर रघुनाथ पालव, माजी सभापती सुधीर साळसकर, माजी खजिनदार श्री. विवेक कृष्णा पालव,उप खजिनदार विश्वनाथ दिगंबर पालव, सह चिटणीस श्री. भास्कर वसंत पालव, श्री.अभिमन्यू अर्जुन पालव, श्री. सुभाष जनार्दन पालव, श्री. एकनाथ बाबाजी पालव, श्री. सुधीर सोम सावंत, श्री. अशोक रामचंद्र पालव, श्री. सुर्यकांत रघुपती पालव,श्री. रमेश घनश्याम पालव, सोनू विश्राम शिंदे, श्री. सुधीर विश्वनाथ परब, प्रकाश फणसे, श्री. सतिश सोम सावंत, श्री. सुधीर रामचंद्र साळसकर, श्री. संतोष परब आदी उपस्थित होते.प्रास्ताविक श्री ठाकूर यांनी केले.