Home स्टोरी म्हसळा सार्वजनिक वाचनालयांत स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी.

म्हसळा सार्वजनिक वाचनालयांत स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी.

149

म्हसळा प्रतिनिधी:(संजय खांबेटे): म्हसळा सार्वजनिक वाचनालयांत आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४० वी जयंती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जिवना वरील पुस्तकांचे प्रदर्शन साजरे करण्यांत आले.विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म भगूर-नाशिक येथे२८ मे १८८३, सावरकर भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाज सुधारक, मराठी कवी व लेखक होते.तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी या चळवळींचे प्रणेते होते. सन १९३८ च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. हिंदुत्व या संकल्पनेचे प्रणेते असून सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणारे होते असे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाला अध्यक्ष संजय केशव खांबेटे, शिवसेना शिंदे गटाचे उप ता. प्रमुख प्रविण विनोद बनकर सर दिपक रमेश जोशी, चिखलप चे बुवा दिलीप  धोंडू शिंदे सर, ग्रंथपालउदय कृष्णा करडे आणि अन्य वाचक उपस्थित होते यावेळी सावरकर वाद,समग्र सावरकर वाडःमयचे अनेक खंड, भारत मातेचा वीर पुत्र,स्वातंत्र्यवीर सावरकर चारित्र आणि कार्य  स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, सावरकर -आंबेडकर यांचे विचार समिक्षा आणि अन्य विविध. संग्राह्य पुस्तके प्रदर्शनात होती.