Home स्टोरी म्हसळा पोलीस स्टेशन मध्ये काम करताना धर्मनिर्पेक्षपणे आणि एकोप्याने काम करणे आवश्यक!...

म्हसळा पोलीस स्टेशन मध्ये काम करताना धर्मनिर्पेक्षपणे आणि एकोप्याने काम करणे आवश्यक! स.पो.नी. संदीपान सोनावने

309

म्हसळा प्रतिनिधी:(संजय खांबेटे): म्हसळा पोलीस स्टेशन मध्ये नियत कालावधी नंतर बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना निरोप समारंभाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला अत्यंत भावनावश व घरगुती कार्यक्रमांत पोलीस स्टेशन मध्ये काम करताना धर्मनिर्पेक्षपणे आणि एकोप्याने काम करणे आवश्यक असते असे मत स.पो.नी संदीपान सोनावने यानी आपल्या मनोगतांत व्यक्त केले, म्हसळा पोलीस स्टेशन मधून जाणाऱ्या प्रत्येकाने पूर्ण क्षमतेनी काम केल्यामुळे जिल्ह्यांत पोलीस स्टेशनचे क्रीष्ठांकडून कौतुक झाले माझे कौतुक हे तुमचेच  कौतुक आहे. कर्मचारी-आधीकारी कमी असले तरी नागरिकांची सेवा आपण सर्वानी परिपूर्ण केली आसल्याचे सोनावने यानी कौतुकाने सांगितले. बदलीहून अन्य ठिकाणी जाणाऱ्या आणि येणाऱ्या कर्मचाऱ्यानी कोणताही भेदभाव न करता एकोप्याने काम करावे यश निश्चित आहे असे सांगून शुभेच्छा आणि स्वागत केले.

कार्यक्रमांत ASI मल्हारी मढवी आणि मल्हारी तोरसल्ले यानी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी ASI मल्हारी वामन मढवी, महिला पोलिस नाईक स्वप्नाली पवार, पोलिस शिपाई मल्हारी तोरसल्ले, पोलिस शिपाई प्रकाश कदम यांना निरोप आणि शुभेच्छा दिल्या यावेळी PSI सुर्यवंशी, PSI योगिता बांडे, ASI राजेंद्र म्हात्रे, म. हेड कॉन्स्टेबल सुषमा पाडगे, हेड  कॉन्स्टेबल सूर्यकांत जाधव, कॉ. समर्थ सांगळे, महिला कॉ.वर्षा पाटिल, कॉ. प्रकाश हंबिर, पोलिस कॉ. विजय फोपसे, राजेंद्र खाडे, देवीदास कारखीले नवनियुक्त कर्मचारी पोलिस नाईक विघ्ने, पोलिस कॉ पोळ व अन्य कर्मचारी उपस्थित होते. म्हसळा पोलीस स्टेशनमध्ये नव्याने एकूण १७ कर्मचारी बदली होऊन येत  आसल्याचे  समजते..