Home स्टोरी म्हसळा तालुक्यात श्रीवर्धन- गोरेगाव रस्त्यावर वडाचेझाड पडून तब्बल १ तास वाहतुक ठप्प!...

म्हसळा तालुक्यात श्रीवर्धन- गोरेगाव रस्त्यावर वडाचेझाड पडून तब्बल १ तास वाहतुक ठप्प! वणव्याची करामत : खाजगी जमिन मालकांचे होतेदुर्लक्ष.

119

म्हसळा प्रतिनिधी: (संजय खांबेटे):-थंडी संपून उन्हाळा वाढू लागला की, कोकणातला वणव्यांचा प्रश्न प्रतिवर्षी ज्वलंत बनू लागतो. तरुणांनी धरलेला मुंबईचा रस्ता,दिवसेंदिवस पडिक राहणारी जमीन, त्या जमिनीत प्रतिवर्षी वाढणारे गवत आणि ते नष्ट करण्यासाठी नापिक ओसाड जामिनी वर होणारा खर्च कोकणातील लोकाना न परवडणारा ठरत आहे. आशाच मालकी जमिनीतील वणव्याने तब्बल १ तास गोरेगाव- म्हसळा रस्त्यावरील वाहतुक रोखून धरल्याची घटना काल शनिवार दि ११ मार्च रोजी घडली. सदरची घटनागोरेगाव- म्हसळा रस्त्यावर खामगाव नजिक घडल्याचे सांगण्यात आले या वेळी दोनही बाजूने शेकडोनी वाहने अडकली होती.

एस.टी. प्रवासी संघटनेचे अनिल महामुनकर यानी तात्काळ श्रीवर्धन-माणगाव एसटी स्थानक आणि विभाग नियंत्रक पेण , वन विभाग म्हसळा, P.W.D. महाड- श्रीवर्धन विभागांना दूरध्वनीने घालून मार्ग खुला करून घेतला. खाजगी जामिनीत मोठया प्रमाणात वाढणारे गवत नष्ट करण्यासाठी लावले जाणारे वणवे हेच मुख्य कारण असावे, हे अद्यापी एक न सुटणारे दुष्टचक्र बनून सध्या राहिले आहे.म्हसळा तालुका वनक्षेत्रात सुमारे५२२१ हेक्टर क्षेत्रांत वनसंपत्ती आहे. फेब्रुवारी ते मार्च १० पर्यंत मालकी (खाजगी) क्षेत्रात प्कूण १८ वणवे व फाॅरेस्ट क्षेत्रात ९ वणवे लागले आहेतवन खात्याचे एकूण२५ हे.क्षेत्रांत  वणवा लागला. खाजगी मालकी क्षेत्रांत नेवरुळ,म्हसळा,वरवटणे , घुम,पानवे,जांभूळ, कोळे, केल्टे, पानदरे,आंबेत मरयामखार , कुडतुडी,निगडी आशा गावांतून आहे. वणवे लागले आहेत. कोलवट,वरवटणे,घुम,पानवे,जांभूळ,तोराडी,पांगळोली, कुडगाव,मोरवणे इत्यादी गावातील सरकारीवन क्षेत्रात वणवे लागल्याच्या नोंदी आहेत.” गाव- वाडींतील मूळ मालकानी बहुतांश जमीनी ह्या मुंबई- पुणे -नाशिक-जळगाव या भागातील लोकाना वारेमाप भावाने विकल्याने जमीन मालकाना रस राहीला नाही”फोटो :रस्त्यालगतचे भला मोठा वटवृक्ष पेटून रस्त्यावर पडला आहे. दोनही बाजूने वाहतुक ठप्प आहे हे दिसत आहे.