Home स्टोरी म्हसळा तालुक्यांत ४ गावाना होत आहे दूषीत पाणी पुरवठा! ग्रॅस्टोची लागण होण्याची...

म्हसळा तालुक्यांत ४ गावाना होत आहे दूषीत पाणी पुरवठा! ग्रॅस्टोची लागण होण्याची शक्यता.

130

म्हसळा प्रतिनिधी: म्हसळा तालुक्यातील मेंदडी ,तुरूंबाडी, वारळ,काळसुरी, या चार गावातील सुमारे ५ ते साडेपाच हजार लोकसंखेला मेंदडी, जिल्हा परिषद पाझर तलावांतून स्वतंत्र योजनेद्वारे पाझर तलावांचे खालील बाजूने आसलेल्या विहीरींतून पंपाद्वारे साठवण टाकी मार्फत पाणीपुरवठा केला जातो. तलावंतील पाणी साठा कमी झाल्याने पाण्यातील जलपर्णी वनस्पती आणि चिखलामुळे पाण्याला वास आणि रंग येत  आसल्याचे समजते. या परिसरातील वारळ, तुरूंबाडी या गावांतून २०१२ चे दरम्यान ग्रॅस्टोची लागण झाली होती.” तलावांत असणाऱ्या जलपर्णी, जलकुंभी, परदेशी लव्हाळ्यांच्या विविध जाती, वनस्पती बरोबर काही किटकांचे जैविक आक्रमण होते तसेच जलप्रदूषणामुळे आरोग्यावर घातक परिणाम होत असतात. त्यात पाण्यातील गढूळ पणासुध्दा एक भाग असू शकतो तर अनेकदा स्वच्छ व नितळ दिसणा -या पाण्यामध्येही अंतर्गत दुषित स्त्रोतामुळे पाण्यातील प्रदूषण वाढते त्याचा आरोग्यावर असणारे दुष्परिणाम होतांत या सर्व गोष्टींचे परिणाम वेळीच लक्षात घ्यायला हवेत. यामुळे पाणी टंचाई काळांत तालुक्यांतील आमदार, तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामिण पाणीपुरवठा अभियंता यांचे समन्वयांतून तालुका पाणीटंचाई आराखडा बनवत असते त्या आभ्यासामुळे वारळमधील नागरिक शकील साटविलकर आणि सुनित सावंत यानी मा.तहसीलदार , गटविकास अधिकारी, ग्रामिण पाणीपुरवठा अभियंता यांचे कार्यालयाकडे  निवेदन आणि दूषीत पाणी नमुने दिले आहेत.

ग्रामस्थानी  शासनाकडे तात्काळ वारळसाठी शुद्ध पाणी पुरवठा व्हावा आशी विनंती केली आहे.म्हसळयांतील प्रशासकीय परिस्थिती दोलायमान वारळ येथील ग्रामस्थ गावांत पिण्यासाठी मिळणारे दूषीत पाणी या बद्दल पाणि नमुने घेऊन कार्यालयांत आले असता, त्यानी मार्च माहिना आसल्याने निवदन टपालांत तर पाणी नमुने तपासणीला असे स्पष्ट सांगितले, गटविकास आधिकारी यांचे कडे पेणचा चार्ज, पाणीपुरवठा आधिकारी यांचेकडे रोह्याचा चार्ज आसल्याने तीन्ही निवेदने संबधीताना पोहचेपर्यंत जिल्हाधिकारी रायगड यानी टँकरने पाणी पुरवठा करावा आशी मागणी पुढे येत आहे.