म्हसळा प्रतिनिधी:(संजय खांबेटे): सन २०२३ ची मान्सूनपूर्व तयारी आणि आपत्ती व्यवस्थापन बाबत तहसीलदार म्हसळा यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार दिं.२६ एप्रिल रोजी म्हसळा तालुक्याची आढावा बैठक आयोजीत केली होती. तालुक्याची भौगोलीक परिस्थीती, पर्जन्यमान,दरडी कोसळणे,नदी आणि खाडीकिनारी येणारी पूर परिस्थीती याचा आभ्यास करून आपत्ती पूर्व, आपत्ती कालीन,आणि आपत्ती पश्चात, व्यवस्थापन करण्यासाठी बैठकबोलावीली असता बहुतांश कार्यालय प्रमुखानी ही बाब गांभीर्याने न घेता याकडे पाठ फिरवली, या बैठकीसाठी महसुल विभागाने २२ तालुका स्तरीय कार्यालय प्रमुखाना रितसर आमंत्रण देऊनसुद्धा केवळ ५ कार्यालयीन प्रमुखानी उपस्थिती लावली व अन्य कार्यालयीन प्रमुखानी प्रतिनिधीना पाठविणे पसंद केले.आपत्तीजवळ निगडीत असणाऱ्या या मुख्य खातेप्रमुखाने महसुल विभागाचे आदेशाकडे पूर्णपणे कानाडोळा केला. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील विभागांचा समावेश आहे.शाखा अभियंता सा.बा, उप.अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, वैद्यकिय आधिकारी प्रा.आ.केंद्र.म्हसळा,मेंदडी,खामगाव, अधिक्षक ग्रामिण रुग्णालय म्हसळा, पशुधन विकास अधिकारी,शाखा अभियंता.रा. जि.प .शाखा,म्हसळा, वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण म्हसळा ,उप अभियंता ग्रा.पा.पुरवठा म्हसळा,भारत संचार निगम, उपअधिक्षक भूमी अभिलेख, दुय्यम निंबधक कार्यालय आशा आपत्तीशी संबंधीत असलेल्या सुमरे १२ कार्यालय प्रमुखानी महसुल विभागाचे आदेशाकडे पाठ फिरवली.पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन परिस्थिती गंभीर होते. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्हा तालुका स्तरावर आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येत आसतो. या पद्धतीनुसार प्रत्येक विभागांना कामे नेमून दिलेली असतात.
त्याप्रमाणे त्यांनी आपापली कामे आपत्तीपूर्व काळात, आपत्तीच्या काळात आणि आपत्ती नंतरच्या काळात करावयाची असतात. त्यामुळे सर्व विभागात समन्वय राखला जाऊन आपदग्रस्त जनतेला तात्काळ दिलासा मिळतो हा मुख्य उद्देश या बैठकीना आसतो परंतु किमान १२ खाते आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ नुसार या कामी शासनाला सहकार्य (आदेशाचे पालन) न करणाऱ्या कर्मचाऱ्यां विरुद्ध भविष्यांत कडक कारवाई होऊ शकते.”म्हसळा तालुक्यात मागील २०-२५ वर्षापूर्वी पूर,दरडी कोसळणे, वादळ, पिकांचे नुकसान, साथीचे रोग, भुत्खलन असे अनेक प्रकार घडले आहेत,यावेळी सामाजिक संस्था, पत्रकार, दानशूर व्यक्ती यानी मदत केली आहे .