Home क्राईम म्हसळयात ५ दुचाकी आणि १ कार पार्कीग मध्ये जाळण्याचा प्रकार आज्ञात इसमावर...

म्हसळयात ५ दुचाकी आणि १ कार पार्कीग मध्ये जाळण्याचा प्रकार आज्ञात इसमावर गुन्हा नोंद….

268

म्हसळा प्रतिनिधी: (संजय खांबेटे): म्हसळ्यांत गेले काही वर्ष तालुक्याचा विकास, रस्त्यांचे पसरलेले जाळे, वाढलेले पर्यतन वाहतुक व्यवसाय, विविध राजकिय पक्षांची व्याप्ती याचा आभ्यास करता आवश्यकते पेक्षा आधिकारी -कर्मचारी यांची संख्या कमी आसल्याने शहरांत आणि तालुक्यांत पोलीसांची दहशत संपली आशी नागरिकांत खुली चर्चा सुरू असतानाआज म्हसळा शहरांतील नागरी वस्तीतील मातोश्री पार्क, निता रेसीडन्सी आणि चोचे बिल्डींचे पार्कींग मधील १ कार आणि ५ मोटर सायकल जाळण्याचे प्रकार भर सायंकाळी ५ ते ६ दरम्यान घडले घंटनेची फिर्याद प्रा. शिरीष यंद्रकांत समेळ वय ५५ .रा. निता रेसीडन्सी म्हसळा याने दिल्याने अकस्मात अग्नी रजी. न.१/२०२३ प्रमाणे पोलीसानी गुन्हा नोंदविला. सदरचा गुन्हा घडला रविवार दि १४ मे २०२३ रोजी सायं ५ ते ६ च्या सुमारास घडला असे जाणकारानी सांगितले.

नुकसानीत निता रेसीडन्सी म्हसळा मधील प्रा. शिरीष समेळ यांची एक मारूती सुझीकी एक्स्प्रेस आणि कार क्रं एम.एच ०६ बी.यु. ७९४८, चोचे बिल्डींग साळीवाडा येथे दोन हीरो मोटर सायकल, क्र एम.एच २९ बी.एक्स ३५२८ तीन सुझीकी एक्स्प्रेस  मोटर सायकल क्र एम.एच ०६ सी.एच १८४१, चार ज्युपीटर मोटर सायकल क्र एम.एच ०६ सी.बी.७३३० यामध्ये मातोश्री पार्क मधील एका भाडोत्र्याची एक मोटरसायकल, आणि एक कार सुध्दा पेटविलीआहे मात्र त्यांचा यात समावेश नाही.या सर्व वाहनांचे जळून सुमारे१लक्ष ५५ हजार नुकसान झाल्याचे पोलीस सूत्रानी सांगितले . या परिसरातील पार्कींग मधील दुचाकींचे पेट्रोल चोरीचे प्रकार अनेक वेळा घडण्याचे  प्रसंग झाले आहेत. त्याचाच वापर करून कोणी खेळ म्हणून सुध्दा गाड्या जाळण्याचे प्रकार तर केला गेला नाही ना आशीही चर्चा आहे.

विशेष म्हणजे या तीनही रेसीडन्सी मध्ये पोलीस आधिकारी -कर्मचारी भाडोत्री म्हणून रहातात त्यांचे सर्रास याच मार्गावरुन येणे जाणे असते परंतु दहशत संपली आसा  प्रकार शहरांत नेहमी दिसत आहे.