Home स्टोरी मोबाईलमुळे वाचन संस्कृती संपण्याची भीती…! अनंत वैद्य

मोबाईलमुळे वाचन संस्कृती संपण्याची भीती…! अनंत वैद्य

120

सावंतवाडी प्रतिनिधी: आज प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल आहे आणि त्याच्या हातातून जर मोबाईल घेतला तर त्या मुलाची होणारी घालमेल काही वेगळीच असते. मोबाईल हा आल्यापासून पालकापर्यंत सगळ्यांचा जवळचा वाटू लागला आहे आणि त्यामुळे पुस्तकी ज्ञानाची वाचन संस्कृती संपत चालली आहे की काय? अशी भीती व्यक्त होत आहे. अशा स्थितीत आज पुन्हा एकदा साहित्य क्षेत्रातील व्यक्तीने शाळांमध्ये जाऊन वाचन संस्कृती विषयी प्रबोधन करणे आवश्यक आहे. मला ग्रंथ मित्र पुरस्कार मिळाला हा पुरस्कार संपूर्ण सिंधुदुर्ग वासियांचा आहे. मात्र या भागातील पाल्यांची वाचन संस्कृतीची गोडी जेव्हा खऱ्या अर्थाने निर्माण होईल. हाच करा सन्मान असेल असे मत कोकण विभागीय राज्यस्तरीय ग्रंथ मित्र पुरस्कार प्राप्त कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे माजी जिल्हाध्यक्ष अनंत वैद्य यांनी व्यक्त केले. कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, सचिव विठ्ठल कदम, खजिनदार भरत गावडे, सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत, कुडाळ शाखेचे अध्यक्ष वृंदा कांबळी, विवेक परब, सतीश गावडे, सुरेश पवार, सौ. दिपाली काजरेकर, संजय शिंदे, नंदन वेंगुर्लेकर, श्रीमती उषा आठले, जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव श्री राजन पांचाळ आदी उपस्थित होते.

यावेळी श्री वैद्य पुढे म्हणाले मला कोकण विभागीय ग्रंथ मित्र पुरस्कार मिळाला हा तुम्हा सर्वांचा आहे. मी जिल्हा ग्रंथालयाचा अध्यक्ष म्हणून काम केले. गेली कित्येक वर्षापासून मी ग्रंथालय साहित्य चळवळीत आहे. पण आज साहित्य चळवळ पुस्तकी वाचन प्रवृत्ती कमी होत चालली आहे. मोबाईल मधील व्हिडिओ आज सर्वांना आकर्षित करत आहेत. त्यामुळे पुस्तक वाचन कमी होत चालले आहे आणि मुलांमध्ये ही वाचन संस्कृती पुढील काळात नष्ट होईल की काय? अशी भीती मला वाटत आहे. त्यामुळे सर्वांनी वाचनाची सवय लागावी यासाठी आता साहित्यिक क्षेत्रातील व्यक्तीने मुलाच्या हातातील मोबाईल मॅन संस्कृती कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. तरच खऱ्या अर्थाने पुरस्कारांना अर्थ राहील असे ते म्हणाले.

यावेळी जिल्हा अध्यक्ष मंगेश मस्के म्हणाले कोकणीबाचा ग्रंथ मित्र पुरस्कार आनंद वैद्य यांना मिळाला. हा पुरस्कार खऱ्या अर्थाने पद्मभूषण पुरस्कारास एवढाच महान पुरस्कार आहे. पण आपल्या कोकण विभागात वैद्य सरांचा म्हणावा तसा गौरव झालेला नाही. त्याने ग्रंथालय साहित्य शिक्षण अशा सर्व क्षेत्रात त्यांचे योगदान फार मोठे आहे. एका चांगल्या व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा वासियांचा आणि साहित्य चळवळीचा हा पुरस्कार आहे. असे ते म्हणाले.

यावेळी ऍड संतोष सावंत, संजय शिंदे, वृंदा कांबळी, दिपाली काजरेकर, भरत गावडे आदींनी आनंद वैद्य यांना कोकण विभागीय ग्रंथवित्र पुरस्कार मिळाला त्यामुळे आम्हा सर्वांना आनंद होत आहे व कोकण विभागाचा सन्मान केला गेला आहे. चालते बोलते ग्रंथालय म्हणून आनंद वैद्य यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्याकडे साहित्यिक दृष्टिकोन आहे आणि साहित्य चळवळ गावागावात पोहोचवण्यासाठी त्यांनी अपार्टमेंट घेतली आहे. अशा व्यक्तीचा हा गौरव झाला आहे. असे ते म्हणाले. यावेळी प्रास्ताविक विठ्ठल कदम यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने साहित्यिक उपस्थित होते.