Home स्टोरी मोती तलावा मधील पाणी स्वच्छ करण्यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज…!

मोती तलावा मधील पाणी स्वच्छ करण्यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज…!

123

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने मुख्याधिकाऱ्यांचे मानले आभार…!

सावंतवाडी: सावंतवाडी शहराचे सौंदर्य असलेल्या मोती तलावा मधील पाणी दूषित होऊन मासे मरत होते त्यामुळे त्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरली होती ही बाब सर्वप्रथम सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली होती त्यानंतर तलावामध्ये मेलेले मासे काढण्यात आले व पाणी स्वच्छ करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यासाठी नगर परिषदेचे कर्मचारी बाळा सावंत शोएब शेख, तुकाराम जाधव ,वासुदेव धुरी, समीर कदम , ऋतुराज तळगावकर व चंद्रकांत कदम ह्या नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी यासाठी भरपूर मेहनत घेतली.

 

नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गेल्या चार दिवसापासून दोन वेळा पाणी स्वच्छ करण्यासाठी पगार काटाला नेण्यासाठी मोती तलाव मध्ये स्पीड बोट च्या साह्याने पाण्याची जोरदार हालचाल करून पाणी स्वच्छ करण्याच्या प्रक्रिया चालू झाले आहेत त्यामुळे मोती तलाव प्रेमींनी, ज्येष्ठ नागरिक तसेच सामाजिक सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.