Home स्टोरी मैत्रिणीसोबत काल रात्र घालवायच्या नादात तरुणाचा मृत्यू!

मैत्रिणीसोबत काल रात्र घालवायच्या नादात तरुणाचा मृत्यू!

319

२३ ऑगस्ट वार्ता: भंडारा जिल्ह्यात एका धक्कादायक घटना घडली. जिल्ह्यातील हिरणवार लॉजवर मैत्रिणीसोबत काल रात्र घालवायची असल्यामुळे तरुणांने “व्हियाग्रा” नावाच्या शक्तीवर्धक गोळ्यांचे अतिसेवन केलं आणि यामुळे तरुणाचा हृदयविकारानं मृत्यू झाला आहे. तरुणाने “व्हियाग्रा” नावाच्या गोळ्या घेतल्या असल्याचं पोलिसांना प्राथमिक तपासात आढळून आलं आहे. पोलिसांनी त्या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्याचबरोबर त्या तरुणाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नेमकं कशामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला हे स्पष्ट होईल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तो नागपूरचा असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. गोंदिया जिल्ह्यातील एका मुलीशी त्याची मैत्री झाली. त्याचं मोबाईलवरती बोलणं वाढल्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडले.त्यानंतर दोघांच्या भेटी वाढल्या, त्यांची अनेकदा भंडारा जिल्ह्यात भेट होत होती. विशेष म्हणजे दोघांची ओळख दोन महिन्यापूर्वी झाली होती. त्या तरुणीसोबत रात्र घालवायची असल्यामुळे त्याने शक्तीवर्धक गोळ्यांचं अतिसेवन केलं होतं. मृतक तरुण २७ वर्षीय आहे, तर, त्याची मैत्रीण २३ वर्षीय आहे.