Home स्टोरी मृगाक्षी हिर्लेकरचे सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत यश!

मृगाक्षी हिर्लेकरचे सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत यश!

106

मसुरे प्रतिनिधी: इयत्ता चौथी व सातवीच्या विध्यार्थ्यां साठी जी. प. शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेतदेवगड तालुक्यातील हिंदळे भंडारवाडी शाळेची सातवीतील विध्यार्थीनी मृगाक्षी मंगेश हिर्लेकर हिने देवगड तालुक्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तिला २१० गुण प्राप्त झाले आहेत.

जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विध्यार्थ्यां मध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी, स्पर्धात्मक अभ्यासाची सवय लागावी तसेच शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेची आवड लागावी या उद्देशाने सदर परीक्षा घेण्यात येते. मृगाक्षी हिचा महा. राज्य प्राथमिक शिक्षक समिती देवगड शाखेच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका सौ आदिती राणे तसेच पदाधिकारी शिक्षक उपस्थित होते. मृगाक्षी हिच्या यशा बद्दल कौतुक होत आहे.