Home सनातन मुस्लिम वक्फ बोर्डाच्या धर्तीवर सनातन मंदिर मंडळाची निर्मिती करण्याची मागणी; हिंदू मंदिरांचे...

मुस्लिम वक्फ बोर्डाच्या धर्तीवर सनातन मंदिर मंडळाची निर्मिती करण्याची मागणी; हिंदू मंदिरांचे विश्वस्त आणि प्रतिनिधी शिर्डीमध्ये एकत्र.

35

सिंधुदुर्ग: देशभारतील मंदिर व्यवस्थापनातील सरकारचा सहभाग बंद करावा आणि मुस्लिम वक्फ बोर्डाच्या धर्तीवर सनातन मंदिर मंडळाची निर्मिती करावी, या मागणीसाठी महाराष्ट्रातील सुमारे एक हजार हिंदू मंदिरांचे विश्वस्त आणि प्रतिनिधी दि. २५आणि २६ डिसेंबर दिवशी शिर्डी येथे एकत्र येणार आहेत. अतिक्रमण आणि मंदिराच्या जमिनीची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी कायदा, तसेच मंदिरांमध्ये प्रवेशासाठी ड्रेस कोड लागू करण्याची मागणीही या बैठकीत करण्यात येणार आहे.

 

महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद, हिंदु जनजागृती समिती, विरार येथील श्री जीवदानी देवी मंदिर आणि पुण्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर यांच्या वतीने आयोजित या बैठकीला अष्टविनायक मंदिरे, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, देहू देवस्थान आदी प्रमुख मंदिरांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.