रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे या ४ जिल्ह्यांना आज रेड अलर्ट….
२६ जुलै वार्ता: आयएमडीनुसार, कोकणातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येकी २ असे एकूण ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला गेला आहे. त्यामुळे या 4 जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्यांना ऑरेन्ज अलर्ट? मुंबई, ठाणे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेन्ज अलर्ट दिलाय. त्यामुळे या ४ जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
