Home राजकारण मुरादाबादमध्ये भाजपसाठी अत्यंत धक्कादायक वृत्त.

मुरादाबादमध्ये भाजपसाठी अत्यंत धक्कादायक वृत्त.

185

२१ एप्रिल वार्ता: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुरादाबाद लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सर्वेश सिंह यांचे निधन झाले आहे. हे भाजपसाठी अत्यंत धक्कादायक वृत्त आहे. विशेष म्हणजे कालच पहिल्या टप्प्याच्या निवडणुकांसाठी मुरादाबादमध्ये मतदान पार पडले. भाजप उमेदवार सर्वेश सिंह हे देखील मतदानासाठी आले होते. आज त्यांचे निधन झाले आहे.

नियमानुसार मतदानापूर्वी कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराचा मृत्यू झाला तर निवडणूक रद्द होते. मात्र मुरादाबादमध्ये यापूर्वीच मतदान झाले आहे, त्यामुळे सध्या मतमोजणीवर कोणताही परिणाम होणार नाही. मतमोजणीनंतर सर्वेश सिंह विजयी झाल्यास ही जागा रिक्त घोषित करून फेरनिवडणुकीची प्रक्रिया होईल. सर्वेश सिंह यांच्या विरोधात सपाने रुची वीरा यांना उमेदवारी दिली होती.