मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): मुणगे येथील श्री भगवती हायस्कुल येथे ‘जागतिक योग दिन प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या योगाच्या बहारदार प्रात्यक्षिकांनी उत्साहात साजरा झाला. यावेळी सरपंच सौ. साक्षी गुरव, माजी मुख्याध्यापक संजय बांबूळकर, ग्रामपंचायत सदस्य अंजली सावंत, सौ. गौरी तवटे, एन. जी. वीरकर, प्रसाद बागवे, हरीश महाले, गुरुप्रसाद मांजरेकर, सौ. कुमठेकर, सौ मिताली हिर्लेकर, प्रियांका कासले आदी शिक्षक उपस्थित होते.
चांगल्या निरोगी आरोग्यासाठी योगा करणे अत्यावश्यक आहे. शास्त्रीय पद्धतीने माहिती घेऊन सातत्य ठेवून योगा करावा असे आवाहन माजी मुख्याध्यापक संजय बांबूळकर यांनी यावेळी केले. सर्व विद्यार्थ्यांनी योगा मार्गदर्शक प्रशालेचे शिक्षक एन. जी. वीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणायाम, विविध योगासनांचा सराव करीत आजचा योगदिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने संपन्न केला. सुत्रसंचलन सौ गौरी तवटे तर आभार सौ कुमठेकर यांनी मानले.