Home स्टोरी मुणगे आडवळवाडी येथे आज १३ मे रोजी पारंपारिक आध्यात्मिक डबलबारी भजन!

मुणगे आडवळवाडी येथे आज १३ मे रोजी पारंपारिक आध्यात्मिक डबलबारी भजन!

123

मसुरे प्रतिनिधी: आडवळवाडी एकता मंडळ, मुणगे येथे सार्वजनिक श्री सत्यनारायणाची महापूजा १३ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी ३ ते ६ वा. हळदीकुंकू समारंभ,सायं ६ वा. श्री सत्यनारायण महाआरती,रात्रौ ८ वा. स्थानिक भजन, रात्रौ ९.३० वा. पारंपारिक आध्यात्मिक डबलबारी भजन सामना बुवा : ह.भ.प. नंदादिप वंजारे डोंबिवली (पू) विरुद्ध बुवा श्री. आनंद जोशी (नाडण) यांच्यात होणार आहे. उपस्थीतीचे आवाहन आडवळवाडी एकता मंडळ, मुणगे यांनी केले आहे.