मसुरे प्रतिनिधी:( पेडणेकर): गत सात वर्षाच्या कालावधीमध्ये जि. प. शाळा वेतोरे डिगवेवाडी, ता. वेंगुर्ला येथे मुख्याध्यापक म्हणून सौ. शमिका चंद्रशेखर आंगणे यानी उत्कृष्ट काम केले. तसेच आपल्या मनमिळाऊ स्वभावाने पालक व ग्रामस्थ यांना आपलेसे करून शाळेमध्ये बऱ्याच सोयीसुविधा केल्या. नेहमी मुलांची प्रगती व शाळेचा विकास हाच त्यांचा ध्यास होता.असे प्रतिपादन मान्यवरांनी केले ते आंगणे मॅडम यांच्या निरोप समारंभाला.
शासन निकषाप्रमाणे आंगणे मॅडम यांची कुडाळ तालुक्यात बदली झाल्याने सर्व पालकवर्ग ग्रामस्थ, सहकारी शिक्षिका व आजीमाजी विद्यार्थी या सर्वांनी मिळून त्यांचा शुभेच्छा समारंभजि. प. शाळा वेतोरे डिगवेवाडी येथे आयोजित करण्यात आला होता. शाल, श्रीफळ, व भेटवस्तू देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्याचा एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला.
अशा शिक्षिका प्रत्येक शाळेला लाभल्यास शाळेचा व मुलांचा विकास होण्यास फारसा वेळ लागणार नाही. असेही उदगार यावेळी काढण्यात आले. त्यांची काम करण्याची पद्धत व काम करण्याची तळमळ पाहूनच पुन्हा बदलीने आपल्याच शाळेत यावं अशी अपेक्षाही सर्वांनी व्यक्त केली. आंगणे मॅडम म्हणाल्या, आपला असा सन्मान केला जाईल असं यत्किंचिंतही वाटले नव्हते. असे पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी, सहकारी शिक्षिका मला लाभल्याबद्दल देवाचे आभार मानते आणि आपण सदैव ऋणी राहू असे म्हणून सर्वांप्रति आदर व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रम प्रसंगाच्या वेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री, संदीप गावडे, उपाध्यक्ष अनुष्का सावंत, ग्रामपंचायत सदस्य श्री, विक्रम सावंत, सहकारी शिक्षिका सौ शिरोडकर मॅडम, अंगणवाडी सेविका राऊळ मॅडम व सौ. स्नेहल वालावलकर व सर्व पालक वर्ग आजीमाजी विद्यार्थी उपस्थित होते.