Home स्टोरी मुख्‍यमंत्र्यांनी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना दिली ‘पंचप्रण शपथ’ !

मुख्‍यमंत्र्यांनी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना दिली ‘पंचप्रण शपथ’ !

58
  • मुंबई: मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ ऑगस्‍ट या दिवशी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना पंचप्रण शपथ दिली. ‘भारताला वर्ष २०४७ पर्यंत आत्‍मनिर्भर आणि विकसित राष्‍ट्र बनवण्‍याचे स्‍वप्‍न साकार करू. गुलामीची मानसिकता मूळापासून नष्‍ट करू. देशाच्‍या समृद्ध वारशाचा गौरव करू. भारताची एकात्‍मता बलशाली करू. देशाचे संरक्षण करणार्‍यांप्रती सन्‍मान बाळगू आणि देशाचे नागरिक म्‍हणून सर्व कर्तव्‍यांचे पालन करू, अशी पंचप्रण शपथ या वेळी सर्वांनी घेतली. या वेळी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अन्‍य मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी व्‍यासपिठावर उपस्‍थित होते. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्‍या पोस्‍टल तिकिटाचे अनावरण मान्‍यवरांच्‍या हस्‍ते झाले.

पंचप्रण शपथ म्‍हणजे काय ?….भारताला २०४७ पर्यंत विकसित बनवण्‍याचे स्‍वप्‍न साकार करण्‍याची, गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकण्‍याची, देशाच्‍या समृद्ध वारशाचा अभिमान सदैव बाळगण्‍याची, एकता आणि एकजूट यासाठी कर्तव्‍यदक्ष रहाण्‍याची, नागरिकाचे कर्तव्‍य बजावण्‍याची आणि देशाचे रक्षण करणार्‍यांचा कायम आदर राखण्‍याची शपथ ही पंचप्रण शपथ आहे.