१८ फेब्रुवारी वार्ता: मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला २१ ते ६५ वयोगटातील महिलांना १ सहस्र ५०० रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना आता प्रत्येक वर्षी ‘ई – केवायसी’ करावी लागणार आहे.
या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना प्रतिवर्षी जून महिन्यात ई-केवायसी प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आले आहे. बदललेल्या निकषानुसार, लाभार्थी महिलांची ई-केवायसी प्रक्रिया प्रत्येक वर्षी १ जून ते १ जुलै या काळात केली जाईल. यामुळे महिलांच्या अर्जाची योग्य पडताळणी होऊन त्यांनी दिलेल्या माहितीची सत्यता पडताळून घेण्यासही साहाय्य होईल.
लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत २ कोटी ६३ लाख महिलांनी अर्ज केले होता, त्यापैकी २ कोटी ४१ लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. अद्याप ११ लाख महिलांच्या अर्जांची पडताळणी शेष आहे.