Home राजकारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तडकाफडकी गुजरातला रवाना!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तडकाफडकी गुजरातला रवाना!

216

२८ ऑगस्ट वार्ता: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकदम तडकाफडकी गुजरातला रवाना झाले आहेत. गुजरामध्ये गेल्यानंतर शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. शिंदे अचानक गुजरातला का गेले? या मागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. शिंदे दि. २७ ऑगस्ट ला परभणी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला हजेरी लावली. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर शिंदे तातडीने गुजरातला रवाना झाले. दरम्यान, शिंदे अचानक गुजरातला रवाना झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.