Home स्टोरी मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्यासाठी मुंबईकरांचा मूकमोर्चा!

मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्यासाठी मुंबईकरांचा मूकमोर्चा!

60

मुंबई: भारतीय रेल्वे चालू होण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणारे थोर समाजसुधारक कै. नाना शंकरशेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देण्यात यावे, यासाठी १५ एप्रिल या रेल्वेदिनाच्या दिवशी नाना शंकरशेठ प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद यांच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला. कै. नाना शंकरशेठ चौक ते मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकपर्यंत मूकमोर्चा काढण्यात आला. नाना शंकरशेठ यांनी लोककल्याणासाठी सहस्रो एकर भूमी दान केली. मुंबई सेंट्रल टर्मिनसला त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव वर्ष २०२० मध्ये राज्यशासनाकडून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे; मात्र त्यावरील कार्यवाही प्रलंबित आहे. ३१ जुलै या दिवशी नाना शंकरशेठ यांची १५८ वी पुण्यतिथी आहे. तोपर्यंत तरी त्यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला द्यावे, अशी भावना मोर्च्यात सहभागी झालेल्या नागरिकांनी व्यक्त केली.