१० जुलै वार्ता: मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात निर्दोष व्यक्तींना अटक केली आहे. ते तुरूंगात शिक्षा भोगत आहेत. त्या व्यक्ती पूर्णपणे निर्दोष आहेत, एटीएस मुंबईने चुकीच्या पद्धतीने अटक केली आहे. बॉम्बस्फोटाला १७ वर्षे झाली असून मुंबई उच्च न्यायालयाने या आरोपीबाबत तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी आरोपींच्या नातेवाईकांनी मागणी केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात आज तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या आरोपींचे नातेवाईक एकत्र आले होते. बॉंम्ब स्फाटोतील आरोप सादीद अन्सारी याचा मोठा भाऊ खलीद अन्सारी, आरोपी जमीर शेख याचा भाऊ शरिफ शेख, आरोप मोहम्मद अली शेखचा मुलगा मोहम्मद सोहील शेख, आरोपी नावेद खान याचा भाऊ वालिद खान, आरोपी असीफ खास याची आई हुस्न बानो आदींनी आपल्या व्यथा मांडल्या.