Home स्टोरी मुंबई गोवा हायवेच्या दुरावस्थेबाबत मदन काष्टे यांचे राजकीय नेत्यांना सवाल वजा स्मरणपत्र.

मुंबई गोवा हायवेच्या दुरावस्थेबाबत मदन काष्टे यांचे राजकीय नेत्यांना सवाल वजा स्मरणपत्र.

119

सावंतवाडी प्रतिनिधी: मुंबई गोवा हायवे गेली वीस वर्षे आहे तसाच आहे. हा रस्ता तर होतच नाही पण त्यापेक्षाही दुर्ग जिल्ह्यातील गावागावात वाड्या वाड्यात जाणारे रस्ते ही खड्डेमय आहेत. याबाबत वारंवार सर्व स्तरांवर तक्रारी करूनहि काहीच होताना दिसत नाही. (तळवडे-गडगेवाडी-काष्टेवाडी) रस्त्याची सध्या परिस्थिती सारखीच आहे. गेल्या विस वर्षापासुन अर्धवट स्थितीत रस्ता आहे. वस्ती वाड्यापर्यंत हा रस्ता पूर्ण झालेला नाही. आमच्या वाड्यात गणेश चतुर्थीला आमदारापासून सर्वच राजकीय मंडळी घरचे गणपती दर्शनासाठी येतात. पण ज्या मार्गावरून देतात तो रस्ता अर्धवट स्थितीत आहे.  हे त्यांना सांगू नाही त्यांच्यावर कोणताच फरक पडत नाही. आमच्या भागातील हा रस्ता पूर्ण होईल का? असा सवाल वजा स्मरणपत्र खासदार नारायण राणे, आमदार दिपक केसरकर आधी सर्व स्तरावर देण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते मदन काष्टे यांनी.

दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, ते म्हणतात गेली वीस वर्ष या रस्त्याबाबत निधी उपलब्ध होतो. पण पुढे काही रस्ता होतच नाही. नेमका निधी हा जातो कुठे? हा प्रश्न आहे हा रस्ता अर्धवट स्थितीत का? असा सवाल व्यक्त केला आहे. मी ग्रामपंचायत आधी सर्वच पातळ्यांवर तक्रारी करून झाल्या. या रस्त्याबाबत अनेकदा सर्व हकीगत ग्रामपंचायत तसेच वरिष्ठ कार्यालयापर्यंत कळवल्या पण वीस वर्षे झाली याबाबत काहीच का होत नाही. आम्ही आता थकलो आहोत हे सर्व करून आता तरी तुम्ही न्याय द्या. अशी विनवणी काष्ट यांनी केली आहे.

दरवर्षी रस्त्यासाठी निधि पास होतो. पण गावातील राजकारणी आणि गडगेवाडीतील राजकारणी मंडळी तो निधी आपल्या वाडीत किंवा आपल्या घरापर्यंतचा रस्ता अजून चकचकीत करण्यात उपयोग करुन घेत आहेत.. असावा नाही त्यांनी पत्रात केला आहे. तळवडे गडगेवाडी काष्टे घराकडील रस्त्यावर पुलावर खड्डे पडले आहेत. गणेश चतुर्थी सणाला पण या रस्त्याच्या खड्यामुळे खुप त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत तळवडे यात लक्ष घालून लवकरात लवकर खड्डे बुझवावे. या खड्यामुळे एखादा अपघात होऊ शकतो याला जबाबदार कोण? याचा आम्हा स्थानिक लोकांना खुप त्रास होत आहे. तरी लवकरात लवकर आपण लक्ष देऊन आम्हाला रस्ता किमान पायी मार्ग तरी सुरळीत करावा अशी विनंती त्यांनी दिलेल्या पत्रा केली आहे. मदन काष्टे यांनी हे स्मरणपत्र सर्व राजकीय नेते पुढारी यांनाही पाठवली आहेत.