सावंतवाडी: मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवरून कणकवलीच्या दिशेने वेगात जाणारी बोलेरो गाडी क्र. Mh 07-AB -6254 ब्रिजवरून थेट महामार्गा वरून खाली कोसळली. या अपघातात रुपेश पांडुरंग तांबे वय वर्ष ३५, रा. जिल्हा कारवार, कर्नाटक हा जखमी झाला असून त्याला उपचारार्थ सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारवार येथून तो कणकवली येथे जात असताना मळगांव हायवे ब्रीज वर हा अपघात घडला. अपघाता बाबत पोलिसांना माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास करत आहेत.







