Home स्टोरी मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेल्या कामाबाबत रायगड पत्रकारांनी आज क्रांतिदिनी केले बोंबाबोंब आंदोलन!

मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेल्या कामाबाबत रायगड पत्रकारांनी आज क्रांतिदिनी केले बोंबाबोंब आंदोलन!

106

सिंधुदुर्ग: मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, या मागणीसाठी रायगड पत्रकारांनी ९ ऑगस्ट क्रांतिदिनी केलेल्या बोंबाबोंब आंदोलनाला सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने पाठींबा दर्शविला. या पार्श्वभूमीवर मुख्यालय पत्रकार संघामार्फत निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

दिलेल्या निवेदनात म्हटले की, मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे आणि मागील १२ वर्षे रखडलेले महामार्गाचे काम याचा निषेध करण्यासाठी रायगड जिल्ह्यामधील पत्रकारांनी दि. ९ ऑगस्टला क्रांतिदिनी बोंबाबोंब आंदोलन केले. या आंदोलनाला जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ सिंधुदुर्गनगरी पाठींबा देत आहोत. महामार्गाचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले असले तरी रत्नागिरी रायगड मध्ये काम पूर्ण झालेले नाही. चालू। असलेल्या कामात गतीही दिसत नाही. त्यामुळे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना पत्रकारांच्या तीव्र भावना कळवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.यावेळी मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे, सचिव लवू म्हाडेश्वर, उपाध्यक्ष विनोद परब, सहसचिव सतीश हरमलकर, नंदकुमार आयरे, दत्तप्रसाद वालावलकर, विनोद दळवी,मनोज वारंग, संजय वालावलकर उपस्थित होते.