Home स्टोरी मुंबईसह कोकणात आज उष्णता वाढणार……

मुंबईसह कोकणात आज उष्णता वाढणार……

107

२३ ऑक्टोबर वार्ता: आज राज्यात ढगाळ व कोरड्या हवामानासह कमाल तापमानात चढ-उतार असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) दाखल झाले असल्यामुळे राज्यात कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. तसेच बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्व किनारपट्टीवर ढगाळ वातावरण  आहे.  काल रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुंबईतील सांताक्रुझ येथे राज्यातील उच्चांकी ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. डहाणू येथे तापमान ३६ अंशांवर होते. आज राज्यात कोरड्या हवामानसह, तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अरबी समुद्रामधील ‘तेज’ चक्रीवादळ रविवारी दि. २२ पासून अतितीव्र झाले आहे. हे चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून दूर येमेन आणि ओमानकडे सकरत असून, उद्यापर्यंत मंगळवार दि. २४ रोजी येमेनच्या अल घाईदाह जवळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे..

काल रविवारी कमाल तापमान पुढीलप्रमाणे होते…

पुणे ३२.९, कोल्हापूर ३२.९, महाबळेश्वर २६.३, नाशिक ३१.०, सांगली ३३.०, सातारा ३१.७, सोलापूर ३५.८, सांताक्रूझ ३७.४, डहाणू ३६.०, रत्नागिरी ३५.१, छत्रपती संभाजीनगर ३२.६, परभणी ३३.७, अकोला ३५.२, अमरावती ३३.६, बुलडाणा ३३.०, ब्रह्मपूरी ३५.३, चंद्रपूर ३३.०, गडचिरोली ३२.६, गोंदिया ३३.२, नागपूर ३३.३, वर्धा ३१.०, वाशीम ३४.०, यवतमाळ ३४.०.