कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – १ मे या महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर मुंबईतील बी के सी मैदानावर होणाऱ्या वज्रमुठ सभेच्या पूर्व तयारी साठी कल्याण पूर्वेतील महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी एकवटले असून पूर्वेतून या बैठकांमध्ये जास्तीत जास्त समर्थकांना सभा स्थळी नेण्याचा एकमुखी निर्णय घेतला जात आहे. राज्यातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आणि कॉंग्रेस आय या पक्षाची असलेली महाविकास आघाडी जास्तीत जास्त मजबूत करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यातील कानाकोपर्यात वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून येत्या १ मे २०२३ रोजी सायं ६ वाजता मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्लेक्स अर्थात बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी कल्याण पूर्वेतून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी जाण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून विभागवार बैठक होत आहेत. या बैठकांतून जास्तीत जास्त नागरीकांनी मुंबईच्या वज्रमुठ सभेस जाण्यासाठी नागरीकांना उपकृत करण्यात यावे या साठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे. शनिवारी सायंकाळी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडीतील स्मामी समर्थ मठाच्या मागे असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात घटक पक्षांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा मिनाश्री आहेर, कार्याध्यक्ष शरद गवळी, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधानसभा संघटक सौ राधिका गुप्ते, तसेच जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी बैठकीस उपस्थित असलेल्या पदाधिकार्यांना संबोधीत केले .या समयी व्यासपीठावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख हर्षवर्धन पालंडे, शहर प्रमुख शरद पाटील, विधानसभा प्रमुख नारायण पाटील, महिला शहर संघटक मिना मालवे, युवा सेनेचे शहर अधिकारी निरज कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत घटक पक्षातील प्रत्येक पदाधिकार्यांनी १ मे रोजीच्या वज्रमुठे सभेचा समाज माध्यमांवर जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करण्याचे सुनिश्चित करण्यात आले. महाविकास आघाडीच्या बैठकीस शिवसेना उबाठा पक्षाचे सर्वश्री प्रकाश जाधव, सत्यवान खेडेकर, गणपत घुगे, हेमंत चौधरी यांचे सहा अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home राजकारण मुंबईत संपन्न होणाऱ्या वज्रमुठ सभेच्या पूर्वतयारीसाठी कल्याण पूर्वेत महाविकास आघाडीच्या बैठकांचा सिलसिला...