Home क्राईम मुंबईत अमली पदार्थांची तस्‍करी करणार्‍या ९ जणांना अटक !

मुंबईत अमली पदार्थांची तस्‍करी करणार्‍या ९ जणांना अटक !

122

१ कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्‍तगत !

मुंबई: – अमली पदार्थांची तस्‍करी करणार्‍या एका सराईत टोळीतील ९ जणांना गुन्‍हे शाखेने मुलुंड परिसरातून अटक केली. अटक केलेल्‍या आरोपींमध्‍ये एका महिलेचा समावेश आहे. पोलिसांनी या आरोपींकडून ३५० ग्रॅम मेफेड्रोन, ४५ ग्रॅम चरस, तसेच चारचाकी आणि काही भ्रमणभाष असा १ कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्‍तगत केला आहे. काही व्‍यक्‍ती मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ घेऊन मुंबईत येणार असल्‍याची माहिती गुन्‍हे शाखेच्‍या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्‍यानुसार त्‍यांनी मुलुंड पथकर नाका परिसरात सापळा रचून वरील कारवाई केली.

 

पोलिसांनी गुन्‍हा नोंद करून साहिल खान (वय २७ वर्षे), अजमल शेख (वय ४५ वर्षे), शमशुद्दीन शहा (वय २२ वर्षे), इम्रान पठाण (वय ३७ वर्षे), तौसीबी मंसुरी (वय २७ वर्षे), इस्‍माईल सिद्धीकी (वय ३६ वर्षे), सर्फराज खान (वय ३५ वर्षे), रईस कुरेशी (वय २५ वर्षे) आणि सना खान (वय २५ वर्षे) या ९ जणांना अटक केली असून त्‍यांच्‍या अन्‍य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

 

या प्रकरणी असा एकूण १ कोटी २० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्‍तगत केला आहे.