Home स्टोरी मुंबईतील कोस्टल रोडला ‘छत्रपती संभाजी महाराजां’चे नाव देणार!

मुंबईतील कोस्टल रोडला ‘छत्रपती संभाजी महाराजां’चे नाव देणार!

140

१६ मे वार्ता: छत्रपती संभाजी महाराज यांची १४ मे या दिवशी ३६६ वी जयंती महाराष्ट्रात साजरी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर कोस्टल रोडला ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळाही उभारण्यात येणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटद्वारे मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.