मुंबई: राज्यामध्ये सध्या व्यभिचार चालू आहे. तशीच वेळ आली तर, मी घरी बसेन; मात्र तडजोड करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोकणामध्ये पक्षाच्या बैठका घेत आहेत. त्या वेळी त्यांनी त्यांची भूमिका मांडली. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील सर्व पदाधिकार्यांना पक्ष सांगेल ते काम करावे लागेल. अन्यथा त्यांना पदावर रहाता येणार नाही’, अशी चेतावणीही त्यांनी या वेळी दिली.मनसे आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येण्याच्या चर्चा चालू असल्याच्या पार्श्वभूमीवर वरील विधान राज ठाकरे यांनी केले आहे.