Home स्टोरी मी छत्रपती शिवाजी महाराज यांंच्‍यापुढे नतमस्‍तक होऊन क्षमा मागतो ! – पंतप्रधान...

मी छत्रपती शिवाजी महाराज यांंच्‍यापुढे नतमस्‍तक होऊन क्षमा मागतो ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

108

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील मालवणमधील राजकोट गडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्‍याने मी त्‍यांच्‍यापुढे नतमस्‍तक होऊन क्षमा मागतो. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर ते आमचे आराध्‍यदैवत आहे.माझे संस्‍कार वेगळे आहेत. मी क्षमा मागण्‍यासाठी सिद्ध आहे. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करूनही क्षमा न मागणार्‍यांपैकी मी नाही. माझे संस्‍कार वेगळे आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. येथील वाढवण बंदराच्‍या भूमीपूजनाच्‍या वेळी ते बोलत होते.

भाजपने ज्यावेळी मला सर्वप्रथम पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केलं, त्यावेळी मी सर्वात आधी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेतलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन मी राष्ट्रसेवेच्या नव्या यात्रेची सुरुवात केली होती. छत्रपती शिवाजी महाराज माझ्यासाठी आणि माझ्या सर्व साथीदारांसाठी केवळ नाव नाही. आम्हा सगळ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहेत. मी आज माझ्या आराध्य दैवताची त्यांच्या पायावर डोकं ठेवत माफी मागतो.