Home स्टोरी मिलाग्रीस हायस्कूल व जुनिअर कॉलेज सावंतवाडीच्या पटांगणावर “प्रायमरी ए ॲन्युल फंक्शन कम...

मिलाग्रीस हायस्कूल व जुनिअर कॉलेज सावंतवाडीच्या पटांगणावर “प्रायमरी ए ॲन्युल फंक्शन कम ग्रॅज्युएशन डे ” च्या कार्यक्रमाचे आयोजन…!

273

सावंतवाडी: आज मंगळवार दिनांक १६ जानेवारी २०२४ रोजी मिलाग्रीस हायस्कूल व जुनिअर कॉलेज सावंतवाडीच्या पटांगणावर “प्रायमरी ए ॲन्युल फंक्शन कम ग्रॅज्युएशन डे “ च्या कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी ५:३० वाजता करण्यात आले आहे . या कार्यक्रमाला सावंतवाडी विधानसभा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा सौ. अर्चना घारे -परब या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर विशेष अतिथी म्हणून फादर अँड्रु डिमेलो हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. त्याकरिता मिलाग्रीस हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य रें. फादर रिचर्ड सालदाना यांनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडील सर्व सन्माननीय पालकांनी या विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमासाठी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.