Home स्टोरी मिलाग्रीस हायस्कूलच्या वतीने “आझादी का अमृत महोत्सव” या भारत सरकारच्या मोहिमे अंतर्गत...

मिलाग्रीस हायस्कूलच्या वतीने “आझादी का अमृत महोत्सव” या भारत सरकारच्या मोहिमे अंतर्गत भव्य रॅलीचे आयोजन.

106

सावंतवाडी प्रतिनिधी: येथील मिलाग्रीस हायस्कूलच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव या भारत सरकारच्या मोहिमे अंतर्गत संपूर्ण सावंतवाडी शहरात भव्य रॅलीचे उद्या शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी आठ वाजता आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थी मिलाग्रीस हायस्कूल येथून पंपास हॉटेल सावंतवाडी या ठिकाणी एकत्र जमणार आहेत. या ठिकाणाहून रॅलीची सुरुवात झाल्यानंतर जगन्नाथराव भोसले उद्याना मार्गे केशवसुत कट्टयाजवळील उभारलेल्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप होईल. तदनंतर सर्व विद्यार्थी एकत्रितपणे शाळेकडे येतील या रॅलीमध्ये एकूण १०० ते १२५ विद्यार्थी तसेच मुख्याध्यापकांसमवेत ५० शिक्षक सहभागी होणार आहेत. तसेच नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. नागरिकांमध्ये देशभक्ती आणि देशप्रेम जागृत करण्यासाठी भारत सरकार राबवत असलेल्या या उपक्रमांमध्ये आपला प्रत्यक्ष सहभाग या रॅलीच्या माध्यमातून करावा. असे आवाहन मुख्याध्यापक यांनी केले आहे.